पुणे : विश्रांतवाडी भागात अमली पदार्थांची विक्री; पाच किलो गांजा जप्त; एकास अटक

पुणे : विश्रांतवाडी भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून पाच किलो गांजा जप्त करण्यात आला. संकेत सुनिल साठे वय ( वय २५ रा. मोशी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. विश्रांतवाडीतील धानाेरी भागात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून अटक केली. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली. पिशवीत गांजा आढळून आला. साठेकडून गांजा आणि मोबाइल संच असा एक लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे आदींनी ही कारवाई केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *