
पुणे : वाहतुक नियमनाऐवजी दंडात्मक कारवाईवर भर देणाऱ्या वाहतुक पोलिसांच्या मनमानी कारभाराला पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चांगलाच चाप लावला आहे. वाहतुक पोलिसांकडून केल्या जाणारी टोईंगची कारवाई व रस्त्याला उभे राहून पावत्या फाडण्याचे प्रकार पुढील आदेश येईपर्यंत थांबवावेत, अशा सुचना वाहतुक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासह रस्ता, मेट्रोची कामे सुरु असणाऱ्या ठिकाणी वाहतुक कोंडीचे प्रकार घडत आहेत. असे असतानाही संबंधित वाहतुक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी रस्त्याच्याकडेला थांबून वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या घटना अजूनही सुरु आहेत.
वाहतुक पोलिसांकडून मनमानी पद्धतीने दंडाची आकारणी करण्यापासून तोडपाणी करण्यापर्यंतचे प्रकार घडत आहेत. त्यातच टोईंग वाहनावरील पोलिस कर्मचाऱ्यासह कामगारांकडूनही वाहने उचलताना वाहनचालकांशी हुज्जत घालण्याचे, त्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार घडले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे नागरीक अक्षरशः त्रस्त आहेत. याबाबतच्या तक्रारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे आल्या आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेत त्यांनी टोईंगची कारवाई व रस्त्याच्याकडेला थांबून पावत्या फाडण्याचे प्रकार थांबविण्याच्या सुचना दिल्या आहेत.
एखादे वाहन वाहतुकीला अडथळा ठरत असेल, तर त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करुन ते पोलिस उपायुक्तांना पाठवावे, त्यांच्या परवानगीनेच संबंधित वाहनांवर पुढील कारवाई करावी, अशाही सुचना आयुक्तांनी दिल्या आहेत. दरम्यान,वाहतुक पोलिसांबाबतच्या तक्रारींची आता विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे. संबंधित चौकशीत दोषी आढळणाऱ्या टोईंग वाहन चालक, मालक किंवा वाहतुक पोलिस कर्मचारी यांच्यावरील जबाबदारी निश्चित करुन, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

