पुणे : लिलाव भिशीत गुंतवणुकीच्या आमिषाने ५७ लाखांची फसवणूक; आरोपी फरार

पुणे : लिलाव भिशीत गुंतवणुकीच्या आमिषाने ५७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी समर्थ पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी शंकर लक्ष्मण गायकवाड (रा. मोरेश्वर अपार्टमेंट, रास्ता पेठ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश किशोर प्रजापती (वय २९, रा. साईनगर, कोंढवा) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाडने लिलाव भिशी सुरू केली होती. दरमहा लिलाव भिशीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्याने गुंतवणुकदारांना दाखविले होते. प्रजापती व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून गायकवाडने पैसे घेतले. गायकवाडने प्रजापती यांना परतावा दिला नाही. प्रजापती यांची एकूण मिळून ३२ लाख रुपयांची फसवणूक केली.

गायकवाडने लिलाव भिशीत गुंतवणुकीच्या आमिषाने राहुल दत्तात्रय वनारसे यांच्याकडून २५ लाख ५० हजार रुपये, आशाराणी रमेश नायकवडी यांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. गायकवाड पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply