पुणे : राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…

पुणे : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला आहे. एकूण १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. तर महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे यात्रेचे आगामन होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या मोठय़ा सभा घेण्याचे प्रदेश काँग्रेसचे नियोजन आहे.

महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संघटनात्मक पातळीवर राहुल गांधी यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पुण्यात प्रसार माध्यमांकडून विचारण्यात आला. यावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले “हा कार्यक्रम काँग्रेस पक्षाचा राहुल गांधींच्या नेतृत्वाखालचा आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या कार्यक्रमात त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांचा समावेश हे होणं योग्य राहील. इतरांनी त्यात सहभागी व्हावं असं काही कारण मला दिसत नाही किंवा कुणी व्हावं अशी सूचना केल्याचंही मला दिसत नाही.”

राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात १६ दिवसांचा मुक्काम –

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा १६ दिवसांचा महाराष्ट्रात मुक्काम राहणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ३८३ किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार आहे. दरोज २५ किलोमीटर गांधी स्वत: या पदयात्रेतून चालणार आहेत. प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्यासह दररोज शंभर कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार आहेत. २५ किलोमीटरचा प्रवास जिथे संपेल ते मुक्काम करणार आहेत. विशेष म्हणजे १६ दिवसांच्या दौऱ्यात राहुल गांधी कुठेही हॉटेलमध्ये मुक्काम करणार नाहीत, तर तंबु टाकून त्यात मुक्काम करणार आहेत. मुक्कात ते त्या परिसरातील शेतकरी, विविध समाज घटक, महिला बचत गट यांच्याशी संवाद साधणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply