पुणे : राज्य सरकारने लव जिहाद विरोधात कायदा करावा, त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार : मिलिंद एकबोटे

पुणे : दिल्ली येथे २८ वर्षीय श्रद्धाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे राज्यभरात विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे सहभागी झाले होते.

सध्या वातावरण फार खराब असून या काही गोष्टी एका दिवसात घडलेल्या नाहीत.या गोष्टीला कोणाची तरी उदासीनता आणि उदारमतवाद कारणीभूत आहे. प्रत्येकाने आपापली विचारसरणी तपासून घ्यावी.अशी गांभीर परिस्थिती निर्माण झाली असून आपला देश वाचवयाचा आहे.आपल्या देशातील माता भगिनी सुरक्षित ठेवायच्या आहेत.तसेच मानवतेच्या विरोधात असलेले जे घटक आहेत.त्याबद्दल आपण सावधगिरीची पाऊल उचलली पाहिजे. तसेच संस्कार हे फार महत्त्वाचे असून याकरीता पालक आणि शिक्षकांनी जागरूक राहिले अशी भूमिका एकबोटे यांनी यावेळी मांडली.

तसेच ते पुढे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारकडून मला एक अपेक्षा होती.ज्या प्रकारे अफजल खानाच्या थडग उचकटून काढल. त्याप्रमाणे लव जिहाद बाबत कायदा होईल.परंतु ती अपेक्षा अद्याप ही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे लव जिहाद विरुद्ध आणि मानवतेच्या मूल्यांना काळिमा फासणारे जे घटक आहेत.त्याची दखल घेऊन, एक चांगला कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा.अशी मागणी राज्याच्या जनतेच्या वतीने मी राज्य सरकारकडे करीत आहे. मात्र सर्व गोष्टी कायद्याने घडणार नाही.त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे.कोणीही प्रेमाच्या खोट्या जाळयात फसू नये.हिंदू धर्माच्या लोकांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगण्याची गरज आहे. तसेच लव जिहाद विरोधात राज्य सरकारने कायदा करावा, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. मस्तानीला धर्म पत्नी करणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा आदर्श ठेवून हिंदू धर्म वाढवा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. तसेच नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. त्यावर मिलिंद एकबोटे म्हणाले की, मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर बोलणार नाही.पण छत्रपती शिवाजी महाराज हे पुढील पाच हजार वर्षासाठी आदर्शच असल्याची भूमिका त्यांनी मांडली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply