पुणे : राजस्थानातील तरुणाकडून तीन किलो अफू जप्त; टिळक रस्त्यावर कारवाई

पुणे : अफू विक्रीसाठी राजस्थानमधून आलेल्या एकाला गुन्हे शाखेने टिळक रस्त्यावर पकडले. त्याच्याकडून तीन किलो अफू, मोबाइल संच, रोकड असा मुद्देमाल जप्त केला. राजू प्रतापराम गुर्जर (वय २२, सध्या रा. कुसाळकर चौक, जनवाडी, गोखलेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुर्जर मूळचा राजस्थानातील पाली जिल्ह्यातील आहे. तो टिळक रस्त्यावर हिराबाग चौकात अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्याच्याकडे पिशवीची तपासणी करण्यात आली. तपासणीत पिशवीत अफू सापडली. जप्त करण्यात आलेल्या अफुची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याने अफू कोणाला विक्रीसाठी आणली होती, यादृष्टीने तपास सुरू आहे. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अजय जाधव, महेश बामगुडे, अजय थोरात, राहुल मखरे, अमोल पवार, इम्रान शेख आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply