पुणे – महापालिकेच्या शहरी गरीब योजनेच्या कार्डासाठी नागरिकांच्या रांग

पुणे - महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचे नवे कार्ड काढणे, जुन्या कार्डचे नूतनीकरण करणे, यासाठी दररोज शेकडो नागरिक महापालिकेत येतात. पण, या कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसणे, एजंटाकडून आलेल्या प्रस्तावांना प्राधान्य देणे, यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. परिणामी, भर उन्हात त्यांना रांगेत थांबावे लागत आहे.

पुणे महापालिकेतर्फे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना शहरी गरीब योजनेच्या अंतर्गत दरवर्षी उपचारासाठी दोन लाख रुपयांची मदत केली जाते. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, मिळकतकराची पावती, रेशन कार्ड यासह इतर कागदपत्रांची गरज असते. त्याआधारे शहरी गरीबचे कार्ड मिळाल्यानंतर एका वर्षासाठी दोन लाखापर्यंतची आर्थिक मदत महापालिका करते. त्याचा आधार शहरातील सुमारे १५ हजार कुटुंब याचा लाभ घेतात.

शहरी गरीब योजनेचे कार्ड काढणे, जुन्या कार्डचे नूतनीकरण करणे, यासाठी नवीन इमारतीच्या तळमजल्यावर कार्यालय आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी स्वतंत्र रांग आहे, तर इतरांसाठी स्वतंत्र रांग आहे. सकाळी दहाच्या सुमारास काम सुरू होते, पण सकाळी पावणे अकरा वाजून गेले; तरी सर्व कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याने कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे लांब रांगा लागत आहेत. तसेच, या योजनेचे कार्ड काढून देण्यासाठी एजंटाकडून एकाच वेळी १०-१५ अर्ज दिले जात असल्याने त्यांचे काम होईपर्यंत इतर नागरिक एकाच जागी थांबून राहतात. वेळ का लागत आहे, याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यात येतील. एजंटामार्फत स्वीकारले जाणारे अर्ज बंद केले जाणार असून, संबंधित कुटुंबातील व्यक्ती या कामासाठी उपस्थित असणे आवश्यक आहे. कर्मचारी उपस्थित राहत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करू. तसेच, अधिक मनुष्यबळ देण्यात येईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply