पुणे : मशिद भोंगे प्रकरण : मनसेला आता वसंत ना’पसंत’; शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी

पुणे : मशिदींवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय खुद्द मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. दरम्यान, साईनाथ बाबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवीन शहराध्यक्ष असतील, अशी घोषणादेखील राज ठाकरे यांनी केली केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवर केलेल्या विधानावर पुण्यात मनसेमध्ये दुफळीचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. 

मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरण मनसेमधील अंतर्गत वादालाच जास्त कारणीभूत ठरल्याचं दिसून येतंय. पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये यासंदर्भात नाराजीनाट्य रंगताना दिसून येत आहे. पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सर्वप्रथम माध्यमांसमोर येत यासंदर्भातील आपली भूमिका मांडली होती.राज ठाकरे यांनी या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना आज मुंबईला बोलावून घेतले होते. मात्र, यामध्ये वसंत मोरेंचाच सहभाग नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीच वसंत मोरे यांची मनसे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply