पुणे : बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले; विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील अल्पवयीन मुलीने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याचा सुमारास हडपसर येथील एॅमनोरा पार्क परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी सांगितली आहे. या घटनेतनंतर हडपसर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अवंतिका कुलशेखर असे १७ वर्षीय मुलीचे नाव आहे. अवंतीका पुण्यातील एॅमनोरा पार्क परिसरात आई-वडिलांसोबत राहत होती. बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने हडपसर परिसरात खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवंतिका आणि तिचे आई-वडील व छोट्या भावासमवेत हडपसरमधील ऍमनोरा पार्क परिसरातील एका इमारतीमध्ये राहतात. अवंतिका इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी अवंतिकाचे आई-वडिल हे शाळेमध्ये भरविण्यात आलेल्या पालक मेळाव्यासाठी गेले होते. तर अवंतिकाचा लहान भाऊ हा शाळेत गेला होता. त्यामुळे अवंतिका घरी एकटीच होती.

काही वेळाने तिचे आई-वडील हे पालक मेळाव्यावरून घरी आले. त्यावेळी अवंतिकाने आई-वडिल इमारतीच्या लिप्टमधून येत असतानाच तिने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर अवंतिकाने चौदाव्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या घरातून खाली उडी मारून जीवन संपवलं. अवंतिकाला बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले होते, त्यामुळे तिनं धक्कादायक पाऊल उचलल्याचं कारण प्राथमिक माहितीत पुढे आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply