पुणे : बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा

बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर बुधवारी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. प्राप्तिकर विभागाने शहरात एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले. देशपांडे यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर उद्योग विश्व;तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

देशपांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. प्राप्तिकर विभागाने देशपांडे यांच्या कार्यालयावर तसेच निवासस्थानी छापे टाकले. या कारवाईत प्राप्तिकर विभागाच्या पथकाने काही कागदपत्रे, इलेक्ट्राॅनिक साधने जप्त केली. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरुन प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. देशपांडे यांची सिटी काॅर्पोरेशन लिमिटेड बांधकाम कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय डेक्कन जिमखाना भागातील फर्ग्युसन रस्त्यावर कार्यालय आहे तसेच हडपसर भागातील अमानोरा पार्क परिसरात एक कार्यालय आहे.देशपांडे यांचे कार्यालय आणि निवासस्थानातून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून या कारवाईत प्राप्तिकर विभागाच्या दिल्ली आणि मुंबईतील अधिकाऱ्यांचे पथक सहभागी झाले.

दरम्यान, प्राप्तिकर विभागाने मंगळवारी ‘बीबीसी’ वृत्तसंस्थेच्या दिल्लीतील कार्यालयात छापे टाकले. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांचे कार्यालय आणि निवासस्थानी काररवाई करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply