पुणे – बँकेतील तारण ठेवलेल्या सोन्यावर डल्ला; बँक अधिकाऱ्यासह साथीदाराला अटक

पुणे - जुन्नरच्या बेल्हे येथील वैष्णवी मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या लॉकरमध्ये नागरिकांनी तारण ठेवलेल्या ५१ लाख २१ हजार रुपये किंमतीच्या ११४ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर वसुली आधिकारी व क्लार्क म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याने त्याच्या मित्राच्या मदतीने बँकेच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे उघड झाले.

बँकेच्याच कर्मचाऱ्याने तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आल्यावर ७२ तासात छडा लावण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. त्यातील चोरी केलेले ११४ तोळे सोन्यासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वसुली अधिकारी विकास शांताराम खिल्लारी व सचिन अशोक सोनवणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात बँकेतील आणखी किती जणांचा हात आहे याचा तपस पोलीस करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply