पुणे : फी न भरल्यानं विद्यार्थ्याला ५ तास खोलीत कोंडलं; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यात शाळेची फी भरली नाही म्हणून इयत्ता ४ थीच्या वर्गात शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थ्याला एका खोलीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोप पालक रमेश शाहू यांनी केलाय. ४ एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली. कोठारी इंटरनॅशनल शाळेच्या  कर्मचाऱ्यांनी रमेश साहू यांच्या पाल्याला कोंडल्यानंतर शाळेचे कर्मचारी ईतके असंवेदनशील वागतात कसे? असा प्रश्न साहू यांनी विचारला. पालक रमेश साहू यांनी शाळेविरोधात तक्रार केली मात्र, शाळाप्रशासाने आरोपांचे खंडन केले. सामची टीम शाळेत पोहचल्यानंतर शाळा प्रशासनाने कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

कोरोनानंतर शाळा पुर्ववर्त सुरू झाल्यानंतर ४ एप्रिल ही घटना घडली आहे. सदरचा विद्यार्थी वर्गात जाताच कर्मचाऱ्यांनी त्याला खेळणी व पुस्तके असलेल्या दुसऱ्या खोलीत नेले आणि तेथे त्याला कुलूप लावले. मुलाने दार वाजवून मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, कोणीही मदतीला आलं नाही. जवळपास पाच तास या मुलाला कोंडून ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

मुलाच्या वडिलांनी सांगितले की, मुलाची फी भरायला उशिर झाल्याने त्याला वर्गात जाऊ दिले जाणार नाही, असा फोन आल्यानंतर ते शाळेत गेले. ते शाळेत पोहचले असता त्यांना मुलाला घेऊन जाण्यास सांगण्यात आले. तसंच मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेले असता ही घटना उघडकीस आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply