पुणे : प्रशासनाचा ताळमेळ नसल्याने भोसले भुयारी मार्ग बंद

शिवाजीनगर : जंगली महाराज रस्त्यावर असलेला जी.एम.भोसले भुयारी मार्ग तीन - चार वर्षापासून बंद आहे. या संदर्भात शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त रवि खंदारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुख्य खाते प्रकल्प कडून दूरुस्तीचे काम चालू आहे.त्यांचे थोडं काम राहिलं आहे.दोन दिवसात ते काम झाल्यावर स्वच्छतेचे काम क्षेत्रीय कार्यालयाच्या मार्फत करणार आहोत, दोन दिवसात सुरू होईल. तर कार्यकारी अभियंता आजय वायसे म्हणाले क्षेत्रीय कार्यालयाच्या मार्फत प्रकाश व्यवस्थेचे काम सुरू आहे. शटरचे काम झाले, दोन दरवाजे बसवायचे आहेत.

गाळेधारकांना व्यावसाय सुरू करण्यासाठी सांगितले आहे.गाळेधारकांचे वीज मिटर बसवायचे आहेत.पुर्वी मोटार चोरीला गेली होती त्यामुळे तिथं सुरक्षा रक्षक नेमावेत यासाठी उपयुक्त माधव जगताप यांच्याकडे मागणी केली आहे परंतु सुरक्षा रक्षक मिळाले नाहीत.सीसीटीव्ही संदर्भात विद्यूत विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. सुरू करण्यासाठी अजून पंधरा दिवस लागतील.

वरिल दोन्ही अधिकाऱ्यांना बोलण्यात विसंगती दिसून येते. एकजण म्हणतात दोन दिवसात सुरू होईल तर दूसरे म्हणतात पंधरा दिवस लागतील या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कसलाही ताळमेळ नसल्याचे स्पष्ट दिसून येते.

स्थानिक लोकप्रतिनिधी,नागरिकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील तो सुरू होत नाही.या संदर्भात माहिती घेतली असता, सदरील भुयारी मार्गात सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही नाहीत. आतमध्ये पाणी साचले असून व्यावसायिक गाळे देखील धूळ खात पडून आहेत.लाखो रुपये खर्च करून तयार केलेला भुयारी मार्ग प्रशासनाच्या उदासिनतेमुळे बंद आहे.जंगली महाराज रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते. आसपास शैक्षणिक संस्था, शासकीय, खासगी कार्यालये, हॉटेल इतर व्यावसायिक दूकाने आहेत.त्यामुळे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिलांची वर्दळ मोठ्या प्रमाणात इथे असते.वाहतूक नियंत्रक दिवे ( सिग्नल) सुरू होण्याच्या अगोदरच वाहने सुसाट वेगाने धावतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply