पुणे पोलिसांना “सर्वोत्कृष्ट पोलिस घटक” पुरस्कार देऊन सन्मान

पुणे : महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने पुणे पोलिसांचा "सर्वोत्कृष्ट पोलिस घटक' म्हणून सन्मानीत करण्यात आला आहे. हा पुरस्कार 2020 या वर्षासाठीचा आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हा पुरस्कार स्विकारला.

पोलिस महासंचालक कार्यालयाच्यावतीने दरवर्षी पोलिस दलाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य पातळीवरील विविध घटकांनुसार पुरस्कार दिले जातात. त्यानुसार, 2020 या वर्षासाठीचा "सर्वोत्कृष्ट पोलिस घटक' हा पुरस्कार पुणे पोलिसांना देण्यात आला. गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत नुकतीच राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद पार पडली. या परिषदेत वळसे पाटील यांच्या हस्ते पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना "सर्वोत्कृष्ट पोलिस घटक' हा पुरस्कार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, गृह विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी या परिषदेस उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलिस दलातर्फे 2020 या वर्षासाठी सात हजार पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या घटकांमध्ये गुन्हे उघडकीस आणणे,निर्गती, दोषसिद्धी, प्रशासन, आस्थापना, जनसंपर्क यांसारख्या विविध प्रकारचे निकष पुणे शहर पोलिस घटक पुर्ण केले. त्यामुळे पुणे शहर पोलिसांना "सर्वोत्कृष्ट पोलिस घटक' म्हणुन गौरविण्यात आले. याविषयी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, ""पुणे शहर पोलिस घटकातील सर्व संवर्गातील अधिकारी व अंमलदार यांनी नियमीत केलेल्या कठोर परिश्रमामुळे त्यांना यश मिळाले. भविष्यकाळतही पुणे पोलिस दल अशी उल्लेखनीय कामगिरी करुन पोलिस दलाची प्रतिमा उज्वल करेल.''

पुणे शहर पोलिस दलातील सर्व पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले आहे. या पुरस्कारामुळे पोलिसांना अधिक चांगले काम करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी नक्कीच बळ मिळेल.''अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply