पुणे : पिंपरी पालिकेत मानधनावरील शिक्षक भरतीसाठी ८५० जणांचे अर्ज

पुणे : अपुऱ्या शिक्षकांच्या समस्येवर तोडगा म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने मानधनावर शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. २८५ जागांसाठी गुरूवारी ८५० जणांनी अर्ज दाखल केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांसाठी सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षकांच्या जागा सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. प्रत्येकी सहा महिन्यांसाठी असणाऱ्या या जागांवर निवड होणाऱ्या शिक्षकांना २० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत याबाबतचे अर्ज गुरूवारी स्वीकारण्यात आले. शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले की, दोन्ही पदे मिळून २८५ जागा आहेत. गुरूवारी ८५० अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची छाननी सुरू केली आहे. १० दिवसांमध्ये याबाबतचा निकाल जाहीर केला जाईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply