पुणे : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर पीएमपीच्या ठेकेदारांची संपातून माघार

पुणे : पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पीएमपीच्या ठेकेदारांनी संपातून शुक्रवारी दुपारी माघार घेतली. पवार यांनी दोन्ही महापालिकाच्या आयुक्तांना पीएमपीची थकबाकी तत्काळ देण्याचे आदेश दिले. त्यानंतर दुपारी वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, प्रशासन आणि ठेकेदारांच्या वादात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांचे मात्र हाल झाले. संपाची पूर्व सूचना न देता पीएमपीचे खासगी ठेकेदार मे ओलेक्ट्रा ग्रीनटेक, मे ट्रॅव्हलटाईम कार रेटल प्रा लि, मे ऍंथोनी गॅरेजेस, मे हंसा वहन इंडिया प्रा लि , एम पी इन्टरप्रायझेस व इव्ही ट्रान्स यांनी संपात भाग घेतला. पीएमपीकडे सुमारे १०७ कोटी रुपयांची थकबाकी गेल्या आठ महिन्यांपासून असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे.

सुमारे दीड महिना पाठपुरावा करूनही थकबाकी न मिळाल्यामुळे शुक्रवारी सकाळी त्यांनी संप पुकाराल. त्यामुळे सकाळी कामांवर जाणाऱ्या नोकरदारांची मोठी अडचण झाली. जवळपास ६५० गाड्या ह्या डेपोत थांबून होत्या. तर पीएम[पी च्या मालकीच्या ९८५ गाड्या रस्त्यांवर धावत होत्या. मात्र सुमारे सातशे बसेस प्रवासी सेवेतून अचानक कमी झाल्याने अन्य बसेस वर भार आला. प्रवाशांना बस ची वाट पाहत थांबत रहावे लागले. तर ज्यांना बस मध्ये प्रवेश मिळाला त्यांना धक्के खातच प्रवास करावा लागला.

सकाळी सात वाजता कंत्राटदारानी संप केला. त्या नंतर घडामोडींना वेग आला. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात होते. त्यांनी तात्काळ पुणे व पिपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक घेतली. पीएमपीची थकबाकी रक्कम तात्काळ देण्याचा आदेश त्यांनी दिला. प्रशासनाने ठेकेदारांची रक्कम गुरुवारीच मंजूर केली होती. त्यानुसार सकाळी त्यांच्या बॅंक खात्यात रक्कम ५४ कोटी रुपये जमा झाले.

वेतनाच्या मुद्द्यावरून कंत्राटदारांनी हा संप केला. मात्र त्यावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही ग्रामीण भागातल्या फेऱ्या कमी करून शहारात वाढविल्या. दुपारी तीननंतर दोन्ही शहरांतील वाहतूक पूर्ववत झाली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply