पुणे : पतीच्या प्रेमसंबंधांना विरोध केल्याने विवाहितेचा छळ; महिलेची आत्महत्या

पुणे : पतीचे बाहेरील महिलांसोबत असलेल्या प्रेमसंबंधांना विरोध केल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. सहकारनगर पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या पती, सासू, सासरे यांना अटक केली आहे.

भिवराज जगन्नाथ तांबे, जगन्नाथ तांबे आणि शेवंता तांबे (रा. तांबेवस्ती, साखरवाडी, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोमल तांबे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना धनकवडी येथील मोहननगरमधील विघ्नहर्ता अपार्टमेंटमध्ये २६ डिसेबर रोजी घडली होती.
याबाबत दादासाहेब राधू खरात (वय ५२, रा. निंबोडी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी कोमल हिचा भिवराज तांबे याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर त्याचे बाहेरील महिलांसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती कोमलला मिळाली. तिने हा प्रकार बंद करायला सांगितला. तेव्हा त्याने कोमलला ‘तू शांत रहा़ जास्त बोलू नको. वाईट परिणाम भोगावे लागतील’ असे म्हणून धमकी दिली. तिचे सासू, सासरे यांनी कोमल हिला सतत घरातील कामावरुन मानसिक व शारीरिक त्रास दिला होता. छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply