पुणे : पतसंस्थेची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक; संचालक, व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा

पुणे : उरूळी कांचन येथील पद्मश्री कोऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक आणि संचालकाने मिळून पतसंस्थेची १ कोटी २८ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार लेखा परिक्षणात उघड झाला आहे. व्यवस्थापकाने ठेवीदारांच्या रकमेतून स्वतःच्या फायद्यासाठी ८३ लाख तसेच संचालकाने कोणालाही विश्वासात ने घेता ४५ लाखांचे कर्ज मंजूर फसवणूक केले. याप्रकरणी पतसंस्थेचे संचालक तसेच व्यवस्थापक यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संचालक संजय दिगंबर कांचन आणि व्यवस्थापक विकास मारूती लोंढे (दोघे. रा. उरूळी कांचन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लेखापरीक्षकांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कांचन यांनी आत्महत्या काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. कांचन हे उरूळी कांचनमधील पद्मश्री कॉ. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक होते. लोंढे पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. २०१६ ते २०१८ या कालावधीत कांचन यांनी इतर संचालकांना विश्वासात न घेता स्वतःच्या सहीने दत्तात्रय कांचन व इतर सहा जणांना ४५ लाखांचे कर्ज मंजूर करून संचालकांचा विश्वासघात केला. व्यवस्थापक लोंढे यांनी संस्थेतील ठेवीदारांच्या रक्कमेतून ८३ लाख २६ हजार रुपये स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता वापरले. दोघांनी मिळून १ कोटी २८ लाखांची फसवणूक केली. पतसंस्थेकडून लेखा परीक्षकाची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक धायगुडे तपास करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply