पुणे – नाशिक महामार्गावर भरधाव दुचाकीवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू

पुणे- नाशिक महामार्गावर भरधाव दुचाकीवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. भोसरीमधून नाशिक फाट्याकडे जात असताना दुचाकीवरील दोघांवर मृत्यू ने झडप घातली आहे. समाधान नथू पाटील (वय- ३६), निलेश राजेश शिंगाळे (वय-३७) असे या अपघातामधील मृतांची नावे आहेत. ही घटना आज (शनिवार) सकाळी सातच्या सुमारास घडली. रस्त्यावर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी पोहचत झाड बाजूला केलं असून वाहतुकीसाठी रस्ता खुला केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- नाशिक महामार्गावर भरधाव दुचाकीवर झाड कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. भोसरी वरून नाशिक फाट्याकडे जात असताना भोसरी पोलीस ठाण्याच्या समोरच ही घटना घडली आहे.

दुचाकीवरील दोघांनी हेल्मेट घातले होते. परंतू, झाड थेट डोक्यात पडल्याने गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला.
झाड दुचाकीवर पडल्यानंतर दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली होती. पुणे – नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते भोसरी पोलीस ठाण्याच्या परिसरात आणि रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाड आहेत. झाड पडल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन विभागाचे संजेश ठाकूर, विठ्ठल घुसे, लक्ष्मण होवाळे, निखिल गोगावले, विकास नाईक, अशोक, अमोल चिपळूणकर, वाहन चालक कोकरे, जाधव आणि मानधन यांनी झाड कापून बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply