पुणे – नात्याला काळिमा! आत्याच्या नवऱ्याकडून 10 वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार

पुणे - माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोली परिसरात घडली आहे. घरात पाहुणा म्हणून आलेल्या आत्याच्या नवऱ्याने स्वतःच्याच दहा वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार केले आहेत.

ह्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने वाघोली परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. दारुडा मामा घरात एकटा असताना त्याने खाऊ आणण्यासाठी घरातील इतर दोन लहान मुलांना पैसे देऊन घराबाहेर पाठविले. त्यानंतर घरात कुणी नसताना आरोपी मामाने स्वतःच्या दहा वर्षाच्या अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

या घटनेतील मामा हा आत्याचा नवरा असून त्याला दारूचे व्यसन आहे. मामाचे हे कृत्या पीडितेच्या आईला समजतात तिने तात्काळ लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी मामा विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी मामा विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *