पुणे : नवजात अर्भक कचरापेटीत सापडले ; घोरपडीतील घटना

घोरपडी बाजारात नवजात अर्भक कचरापेटीत सापडल्याची घटना उघडकीस आली. नवजात अर्भक बेवारस अवस्थेत सोडून देणाऱ्यांच्या विरोधात वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुणे कटक मंडळातील सफाई कामगार महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवजात अर्भकाचे पालकत्व न स्वीकारता त्याला कचरापेटीत टाकून देणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोरपडी बाजार परिसरातील विश्वमित्रा मार्ग परिसरातील कचरापेटीत नवजात अर्भक आढळले. तक्रारदार सफाई कामगार महिलेच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने नवजात अर्भकास ससून रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल केले असून पोलीस उपनिरीक्षक एम. जी. गावडे तपास करत आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply