पुणे : धरणक्षेत्रांत हंगामातील विक्रमी पाऊस ; पाणीसाठा २७ टक्क्यांवर

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला दमदार पाऊस  कायम आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत यंदाच्या हंगामातील विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठा २७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात १६५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात प्रत्येकी १२६ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात ३२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात ७.७४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच २६.५६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शनिवारी रात्री चारही धरणांत ६.९५ टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी रात्रीच्या तुलनेत रविवारी सकाळी ०.७९ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply