पुणे : ‘तुरुंगात जाण्यासाठी परबांनी लवकर बॅग भरावी’ सोमय्यांनचा सूचक इशारा

पुणे : तुरुंगात जाण्याचा पुढील नंबर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब  यांचा असून, त्यांनी लवकर बॅग भरावी असा, सूचक आणि खोचक सल्ला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील आयकर सदनला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

अनिल परब यांच्याविरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू झाली असून, त्यात अनिल परब किती खोटारडे आणि लबाड मंत्री आहेत हे समोर आले आहे. त्यामुळे आता तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक अनिल परब यांचा आला आहे, असे सोमय्या म्हणाले. दरम्यान, दापोलीतील रिसॉर्ट संदर्भात आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत मोदी सरकारने दापोली कोर्टात केस केली असून, त्यात सर्व पुरावे दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *