पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवपदी पहिल्यांदाच महिला न्यायाधीश; मंगल कश्‍यप यांनी स्वीकारला पदभार

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवपदी पहिल्यांदाच महिला न्यायाधीशांची निवड करण्यात आली आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवपदाचा पदभार मंगल कश्यप यांनी स्वीकारला.

विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रताप सावंत यांची बदली झाल्यानंतर कश्‍यप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्यायालयात दाखल असलेले दावे तसेच दाखलपूर्व दावे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून लोकअदालत उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. लोकअदालतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे दावे, अपघात नुकसान भरपाई तसेच कौटुंबिक वादाचे दावे निकाली काढण्यात येतात.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने लोकअदालत उपक्रमाअंतर्गत राज्यात सर्वाधिक दावे निकाली काढले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

जिल्हा न्यायालयात दाखल असलेले दिवाणी दावे तडजोडीतून निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच न्यायालयातील प्रलंबित आणि दाखलपूर्व दावे निकाली काढण्यासाठी लोकअदालत आणि विधी सेवा प्राधिकरणाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी शहरातील विधी महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांची मदत घेतली जाईल.
-मंगल कश्यप, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply