पुणे : खासगी रुग्णालयात महिलेचा विनयभंग; करणाऱ्या कामगारास अटक

पुणे : शिवाजीनगर भागातील एका खासगी रुग्णालयात मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करुन पसार झालेल्या कामगाराला पोलिसांनी अटक केली. अयाज शेख (वय २५, रा. राजीव गांधी वसाहत, खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिलेच्या मुलाला गणेशखिंड रस्त्यावरील एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. तक्रारदार महिला प्रसाधनगृहात आंघोळीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी रूग्णालयातील सफाई कामगार शेखने महिलेचा विनयभंग केला होता.

महिलेने याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासन तसेच पोलिसांना दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शेख गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. तो महापालिका भवन परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी बशीर सय्यद आणि अविनाश भिवरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर आदींनी ही कारवाई केली.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *