पुणे – क्राइम पेट्रोल पाहून पुरुषाने केला महिलेच्या खूनाचा प्लान

पुणे - महिलेला शीतपेयामध्ये झोपेच्या गोळ्या देऊन तिचा खून करणाऱ्या नराधमास 10 तासात गुन्हे शाखेच्या युनिट-5 ने बेड्या ठोकल्या. क्राईम पेट्रोल मालिका बघून प्लॅन करीत खून केल्याची आरोपीने कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. किसन सीताराम जगताप (वय 46, रा. बेलसर, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. स्वाती लक्ष्मण कांबळे (रा. मार्कंडेयनगर, वैदूवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल होता. मयत महिलेचा मोबाईल किसन जगताप याच्याकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या राहत्या घरासमोरून ताब्यात घेऊन अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे मयत महिलेचा मोबाईल, एटीएम कार्ड व इतर वस्तू मिळून आल्या. अधिक तपासामध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हडपसरमध्ये 2009 साली राहत असताना मयत महिलेबरोबर ओळख झाली. माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज होती. क्राईम पेट्रोलिंग मालिका बघून तिच्या खूनाचा प्लॅन केला. 9 एप्रिल 2022 रोजी रात्री 11.30 च्या सुमारास गप्पा मारण्याचे नाटक करीत शीतपेयामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून तिला पाजले. तिला गुंगी आल्याचे लक्षात येताच तिचे डोके भिंतीवर आपटून खून केला. त्यानंतर सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड घेतल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-5चे पोलीस निरीक्षक हेमंतपाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार रमेश साबळे, महेश वाघमारे, आश्रुबा मोराळे, प्रमोद टिळेकर, प्रवीण काळभोर, विशाल भिलारे, अकबर शेख, दाऊद सय्यद, विलास खंदारे, पृथ्वीराज पांडुळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply