पुणे : कोरेगाव मूळ येथे विद्युत शॉक लागून तरुणाचा मृत्यू

लोणी काळभोर : कोरेगाव मूळ ता. हवेली ग्रामपंचायत हद्दीत विजेचा शॉक लागून एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हि घटना रविवारी ता. १० मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमरास घडली आहे.जितेंद्र राधिकाप्रसाद पांडे वय-३२, रा. ईश्वर नगर, वाशी, ठाणे (वेस्ट) मूळ रामपूर तहसील इरवा, जि. सिद्धार्थनगर, राज्य - उत्तरप्रदेश असे विजेचा लागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी त्याचा भाऊ मोहित राधिकाप्रसाद पांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्या मृत्यूप्रकरणी कोणाविरोधात तक्रार नसल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र राधिकाप्रसाद पांडे हे मुंबई येथील एका चालक म्हणून काम करतात. रविवारी (ता. १०) कोरेगाव मूळ या ठिकाणी जाण्यासाठी शनिवारीच ते चालवत असलेली बस करार करून घेतली असल्याने ते बस जितेंद्र पांडे यांना चालवायला दिली होती. रविवारी संध्याकाळी कार्यक्रम असल्याने त्या कार्यक्रमातील किरणकुमार ढवळीकर यांना फोनवरून सांगण्यात आले होते.

दरम्यान, रविवारी गाडीमालक गोविंद भताने यांनी फोनवरून सांगितले कि कार्यक्रम सुरु असलेल्या ठिकाणी बस उभी केली होती. त्या बसवर झोपण्यासाठी शिडीने वरती जाताना त्यास विद्युत तारेचा शॉक लागून जागेवरच मृत्यू झाला आहे. घडलेला प्रकार त्याच्या चुकीने घडला असून कोणाविरुद्ध तक्रार नसलायची माहिती पोलिसांना दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply