पुणे : कोयता गॅंगविरोधात अजित पवारांचा विधानसभेच हल्लाबोल अन् धरपकड करण्यासाठी पुणे पोलीस रस्त्यावर

पुणे : आणि आजूबाजूच्या गावात कोयता गॅंगने धुमाकुळ घातला आहे. या कोयता गॅंगची दहशत थांबवा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडत कारवाई करण्याची मागणी केली होती. या कोयता गॅंगमुळे अनेक सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. मागील अनेक दिवसांपासून नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

पुणे आणि आजूबाजूच्या काही गावांमध्ये कोयता गॅंगनं दहशत निर्माण केली आहे. या गॅंगमधील काही मुलं अगदी तरुण आहे. ही मुलं परिसरातील अनेक रस्त्यावर सक्रिय आहेत. तरुण सोशल मीडियावर गुन्हेगारीशी संबंधित व्हिडीओ पाहतात आणि त्याचं अनुकरन करतात. काही तरुण हॉटेल्सची बिलं देत नाही, गाड्यांच्या काचा फोडतात, महिलांनादेखील दमदाटी करतात. त्यांच्या या कृत्यांमुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत थांबायला हवा. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली होती. 

पुण्यात गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या दहशतीत सातत्त्यानं वाढ होत आहे. त्यांच्यामुळे अनेक पुणेकर धास्तावले आहे. यापूर्वीदेखील त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला गेला होता. मात्र त्यांना पोलिसांचीही भीती नसल्याचं वारंवार समोर आलं. त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत अनेक पुणेकरांना लुटलंदेखील आहे. त्यामुळे या गुन्हेगारांना रोखण्याचं आव्हान सध्या नवीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासमोर आहे. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील अनेक शंभराहून अधिक गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केली होती. त्यांंनी गुन्हेगारी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. धडाधड कारवाई करत शेकडो गुन्हेगारांना जेरबंद केलं होतं. मात्र आता पुण्यात कोयता गॅंगची दहशत वाढताना दिसत आहे. त्यामुळे नवे पोलीस आयुक्त या गॅंगचा कसा शोध घेतला आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply