पुणे : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; देहू संस्थानने घेतला ‘संत तुका म्हणे’ शब्दांवर आक्षेप!

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीने फेसबुकवर पोस्ट केलेल्या त्या कवितेत संत तुका म्हणे हा शब्द वापरण्यात आला असून त्याला आता देहू संस्थानने विरोध दर्शविला आहे. यासंबंधी देहू संस्थानने केतकीवर गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत देहूरोड पोलिसात पत्र दिलं आहे. 

तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे, असे पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या तुका म्हणे शब्दांचा वापर करून वादग्रस्त लिखाण केलेल्या केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अस पत्र देहू संस्थाने पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिलं आहे. केतकीने तुका म्हणे शब्दांचा वापर करून विटंबना, वादग्रस्त लिखाण केले. श्री संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे, असे पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे तुकोबाच नव्हे तर देशातील इतर संतांच्या नावाचा वापर यासाठी करू नये. तसेच असे लिखान करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही देहू संस्थांनने म्हटले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply