पुणे : "एनआयबीएम' संस्थेच्या सुरक्षा पर्यवेक्षकास तलवारीचा धाक दाखवून चंदनाच्या झाडांची चोरी

पुणे : कोंढवा येथील नामांकीत नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बॅंक मॅनेजमेंट (एनआयबीएम) संस्थेतील सुरक्षा पर्यवेक्षकाच्या गळ्यावर तलवार ठेवून, त्यास जीवे मारण्याची धमकी देत चोरट्यांनी संस्थेच्या आवारातील चंदनाची झाडे, कपडे, दुसऱ्या सुरक्षा रक्षकाचे डेबीट कार्ड असा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कोंढवा येथे घडली.

याप्रकरणी भुपेंदरसिंग दारासिंग (वय 41, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरामध्ये "एनआयबीएम' हि नामांकीत संस्था आहे. फिर्यादी या संस्थेमध्ये सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून काम करतात. बुधवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे सहकारी सुरक्षा रक्षक शिवलाल पासवान हे दोघेजण सुरक्षिततेची पाहणी करीत होते. त्यावेळी फिर्यादी हे संस्थेच्या सभागृह व फिल्टर पॉईंट येथे काम करीत होते.

त्यावेळी संस्थेच्या आवारात घुसलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला तलवार लावून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आरडाओरडा न करण्यास बजावले. त्यानंतर चोरट्यांनी संस्थेतील तीन चंदनाची झाडे तोडून त्यातील सहा हजार रुपये किंमतीचे तीन चंदनाचे ओंडके, वॉटर फिल्टर पॉइँट येथे ड्युटी करणारे शिवलाल पासवान यांच्या बॅगेमधील दोन शर्ट, डेबीट कार्ड असअ ऐवज जबरी चोरी करुन नेला. फिर्यादीने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना गिलोरीने दगड मारुन त्यांना जखमी केले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार करीत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply