पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत झेडपीच्या ७६ शाळा पालिकेच्या ताब्यात देणार

पुणे - पुणे महापालिकेत मागील दशकांपासून आजअखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने समाविष्ट झालेल्या ४० ग्रामपंचायतींच्या हद्दीतील जिल्हा परिषदेच्या ७६ शाळा येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महापालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. पालिकेकडे शाळांच्या इमारती आणि विद्यार्थीच वर्ग केले जाणार असून, या शाळांवर कार्यरत असलेले शिक्षक मात्र जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम ठेवण्यात येणार आहेत. यामुळे झेडपीला अन्य शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ५८६ शिक्षक उपलब्ध होणार आहेत.

पालिकेत समाविष्ट होणाऱ्या शाळांमधील शिक्षकांच्या येत्या मे महिन्यात होणाऱ्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत नियमानुसार अन्य शाळांवर नियुक्त्या देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी (ता.१६) सांगितले. जिल्हा परिषदेने या शाळा महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर पालिका प्रशासन त्यांच्या नियमानुसार नव्याने या शाळांवर शिक्षकांच्या नियुक्त्या करेल, असे मत प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केले.

सद्यःस्थितीत या सर्व शाळांमध्ये मिळून सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर केवळ शाळांच्या इमारती या पालिकेकडे वर्ग होत असतात. मात्र या शाळांवर कार्यरत असलेले केंद्र प्रमुख, पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षक हे जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम राहत असतात. त्यामुळे या समाविष्ट गावांमधील शाळांवर नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची जबाबदारी ही पालिकेची असते, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply