पुणे : आता पुण्यातही हिंदुत्ववादी संघटनांचा एल्गार! रविवारी मोर्चाचे आयोजन

पुणे - मागील काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. आता हा जनआक्रोश मोर्चा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. रविवारी हा मोर्चा होणार आहे. (Pune news in Marathi)

अनेक हिंदू संघटना या मोर्चात सामील होणार आहेत. रविवारी पुण्यातील लाल महालाजवळ सगळ्यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा धर्मवीर दिन म्हणून जाहीर व्हावा ही मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी राहणार आहे.

या व्यतिरिक्त गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर याच्या विरोधात हजारो नागरिक येण्याची शक्यता आहे. अनेक हिंदू संघटना कडून मोर्चाची तयारी सुरू करण्यात आली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *