पुणे : अपघातग्रस्त महिलेस मदत करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ

पुणे : दुचाकी घसरुन पडल्याने दुचाकीस्वार महिलेला मदत करणाऱ्या वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना बिबवेवाडीत घडली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अनिकेत गोकुळ केंदळे (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अनिता गोकुळ केंदळे, चिंगाबाई भैरु जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारनगर वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई सागर शिंदे यांनी या संदर्भात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस शिपाई सागर शिंदे बिबवेवाडीतील व्हीआयटी हॅास्टेल चौक परिसरात वाहतूक नियमन करत होते . त्या वेळी एक दुचाकीस्वार महिला घसरुन पडली. पोलीस शिपाई शिंदे आणि त्यांच्या बरोबर असलेली सहकारी महिला पोलीस विभुते यांनी रस्त्यात पडलेल्या महिलेला उचलून मदत केली.

त्या वेळी अनिकेत केंदळेने महिला पोलीस कर्मचारी विभुते यांना शिवीगाळ केली. केंदळे त्याच्याबरोबर असलेल्या अनिता केंदळे, चिंगाबाई जाधव यांनी रस्त्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पोलीस शिपाई शिंदे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या सहकारी विभुते यांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणला. पोलीस उपनिरीक्षक निकम तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply