पुणेकराच्या जोरावर SRH ची बिर्याणी पार्टी; KKR चा बेत फसला!

IPL 2022, KKR vs SRH : पुणेकर राहुल त्रिपाठी अर्धशतकी तडका आणि दक्षिण आफ्रिकेच्या मार्करमनं केलेली तुफानी नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सनरायजर्स हैदराबाद गत हंगामातील उप विजेत्या कोलकाताचा  धुव्वा उडवला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना नितीश राणा आणि आंद्रे रसेलच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर 8 बाद 175 धावा केल्या होत्या.

176 धावांचा करताना सनरायजर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा अवघ्या तीन धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर केन विल्यमसनही 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि मार्करम या जोडीनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या समीप आणले. राहुल त्रिपाठी 71 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मार्करमने षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबादी गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरवत सुरुवातीलाच कोलकाता नाईट रायडर्सला दणक्यावर दणके दिले. कोलकाताच्या संघाने पॉवर प्लेमध्येच पहिल्या तीन विकेट गमावल्या. अजिंक्य रहाणेच्या जाग्यावर संघात स्थान मिळालेल्या ऑस्ट्र्लियन फिंचला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. तो अवघ्या 7 धावा करून तंबूत परतला. व्यंकटेश अय्यरही मो

व्यंकटेश अय्यरलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. तो अवघ्या 6 धावांची भर घालून तंबूत परतला. सुनील नरेनही लवकर बाद झाला. श्रेयस अय्यरनं नितीश राणाच्या साथीनं डाव सावरण्याचा तोकडा प्रयत्न केला. उमरान मलिकने श्रेयस अय्यरला 28 धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर नितीश राणाने स्फोटक खेळी केली. जॅक्सनही 7 धावांची भर घालून परतल्यानंतर आंद्रे रसेलच्या साथीनं त्याने डावाला आकार दिला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. नितीश राणा 36 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 54 धावा करुन बाद झाला. त्यानंतर एका बाजूनं विकेट पडत असताना आंद्रे रसेलनं मसल पॉवर दाखवून देत 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 49 धावा करत संघाची धावसंख्या 8 बाद 175 धावांपर्यंत पोहचवली. हैदराबादकडून टी नटराजन याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. उमरान मलिकला दोन तर सुचीत, जेसन आणि भुवीला एक-एक विकेट मिळाली.

कोलकाता नाईट रायडर्सनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्माच्या रुपात संघाला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. कमिन्सन त्याला बोल्ड केलं. संघाच्या धावफलकावर 39 धावा असताना केन विल्यम्सनही आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्यानंतर मार्करम आणि राहुल त्रिपाठीनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी करत संघाचा विजय पक्का केला. राहुल त्रिपाठी 37 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 71 धावांची खेळी करुन बाद झाला. पण बाद होण्यापूर्वी त्याने हैदराबाद संघाचा बिर्याणी पार्टीचा बेत पक्का केला होता. मार्करमने त्यावर मोहर उमटवली. त्याने 36 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 षटकार खेचले. कोलकाताकडून आंद्रे रसेलच्या दोन आणि पॅट कमिन्सला एक विकेट मिळाली. हैदराबादने हा सामना 7 विकेट आणि 13 चेंडू राखून जिंकला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply