पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बहुतांश जनसंपर्क कार्यालये बेकायदा असल्याचे दिसून येते. नियम पायदळी तुडवून आकर्षक पद्धतीने बांधलेल्या या कार्यालयांवर कारवाई करण्याचे धारिष्टय़ पालिकेने कधीही दाखवले नाही. मध्यंतरी नोटीस बजावण्याचा देखावा केला. पुढे काहीच झाले नाही.
शहरातील सर्व प्रकारच्या बेकायदा बांधकामांची संख्या दोन लाखांहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. महापालिका, प्राधिकरण, एमआयडीसी, रेड झोन तसेच खासगी जागांवर झालेली बांधकामे असे या बेकायदा बांधकामांचे वर्गीकरण सांगितले जाते. कित्येक वर्षांपासून बेकायदा बांधकामे, त्यावर होणारी कारवाई तसेच बेकायदा बांधकामांना लावण्यात येणारी दंडाची रक्कम (शास्तीकर) हा कळीचा मुद्दा ठरला आहे. या विषयावरून वर्षांनुवर्षे राजकारण झाले. मात्र, कोणाचीही सत्ता आली तरी आतापर्यंत यावर ठोस तोडगा निघालेला नाही.
याच विषयाशी संबंधित लोकप्रतिनिधींच्या बेकायदा बांधकामांचा विषय आहे. शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेली, बहुतांश लोकप्रतिनिधींनी (सर्वपक्षीय) जनसंपर्क कार्यालयांसाठी बेकायदा बांधकामे केली आहेत. पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. काहींनी वाढीव बांधकामे केली. काहींनी जागा बळकावून कार्यालये थाटली आहेत. तर, काहींनी रस्त्याला अडथळा होईल, अशा पद्धतीने कार्यालये उभारली आहेत. आतापर्यंत अशा बांधकामांवर कारवाई करणे दूरच, त्याची दखलही कधी घेतली गेली नाही. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पालिकेने लोकप्रतिनिधींच्या बेकायदा बांधकामांची यादी तयार केली होती. त्यानुसार, संबंधितांना नोटिस बजावण्यात आली. त्याद्वारे त्यांचे म्हणणे मागावून घेण्यात आले होते. मात्र, पुढे काहीच झाले नाही. महापालिकेने नोटीस बजावणे एवढेच आपले काम असल्याचे दाखवत कारवाईचा विषय गुंडाळून ठेवला.
लोकप्रतिनिधींवरील कारवाई गुंडाळून ठेवली, असे म्हणता येणार नाही. ज्यांची बेकायदा बांधकामे आढळून आली होती, त्यांना नोटिस बजावण्यात आली होती. त्यांनी बेकायदा असलेले बांधकाम काढून घेतले. तर, काहींनी त्या कार्यालयांचा वापर थांबवला. त्यामुळे पुढील कारवाई करण्याची वेळ आली नाही. बेकायदा बांधकामे आढळून आल्यास निश्चित कारवाई केली जाईल. – मकरंद निकम, सहशहर अभियंता, पिंपरी पालिका
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

