पिंपरी-चिंचवड: शिपायानं विद्यार्थिनीकडे मोबाईल फोनवर मला तू….. तू….. तू…! हवी आहेस,केली धक्कादायक मागणी

पिंपरी-चिंचवड: पिंपरी- चिंचवड शहरातील निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. बारावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी महाविद्यालयातील शिपायाने स्वतः च्याच महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीकडे एक विचित्र मागणी केली आहे. या प्रकरणात पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी विनोद बाबासाहेब चव्हाण या आरोपी शिपायाला अटक केली आहे.

पीडित मुलगी ही अभिमान कॉलेजमध्ये ११ वीच्या वर्गात कॉमर्स शिक्षण घेत असून, आरोपी विनोद बाबासाहेब चव्हाण हा अभिमान कॉलेजमध्ये शिपाई (Peon) या पदावर कार्यरत आहे. विनोद चव्हाण याने बारावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी पीडित विद्यार्थिनीला मोबाईल फोनवर मला तू..... तू..... तू...! हवी आहेस, अशी मागणी पीडित विद्यार्थिनीकडे केली आहे. विनोद चव्हाणने मोबाईलवर केलेल्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग पीडित मुलीने आपल्या मोबाईलमध्ये केली आहे.

या घटनेमुळे पीडित विद्यार्थिनीला मोठा धक्का बसला असून, तिने घडलेला प्रकार आपल्या आई- वडिलांना सांगितल्यानंतर पीडित मुलीने निगडी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. विनोद चव्हाण विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी विनोद चव्हाण यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून, त्याला तातडीने अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *