पवना धरणात तेलाचे तरंग, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मावळ - पिंपरी चिंचवड शहरासह मावळाला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाण्यावर तेलाचा तवंग आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पवना धरणाच्या पाण्यावर हा तेलाचा तवंग कसा आला याबाबत पवना धरण उपअभियंता अशोक शेटे हे मात्र बुचकळ्यात पडले आहेत. त्यांना याबाबत विचारणा केली असता,पवना धरणातील पाणी सोडण्यासाठी सध्या हायड्रोलिक यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. त्यातून काही प्रमाणात तेल गळती होऊन ते मोठ्या प्रमाणात पाण्यात मिसळले असावे असा अंदाज व्यक्त केला आहे.

परंतु या प्रकाराने पवना नदीचं पाणी प्रदूषित झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अचानक पाण्यावर तेलाचा तवंग दिसू लागल्याने जलचर प्राण्यांसह नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
तरी संबंधित पवना धरण अधिकाऱ्यांनी यावर लवकरात लवकर उपाय योजना करावी, काल सायंकाळच्या वेळेस ब्राम्हली, कोथूर्न, येळसे आणि कडध्ये या गावातील काही नागरिकांच्या निर्दशनास ही बाब आल्यावर या पाण्यावर आलेलं तेलाचे तंवग समजले. घडलेला हा प्रकार गंभीर असून या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे असं मत काही पर्यावरण प्रेमी आणि सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केलं आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply