परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे सर्व प्रकरणे CBI कडे द्या; SC चे आदेश

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले 5 गुन्हे निष्पक्ष तपासासाठी सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय या प्रकरणाचे सर्व रोकॉर्ड्स आठवडाभरात सीबीआयकडे सोपवण्यासही सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना सांगितले आहे. न्यायालयाचे या आदेशामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे.

दरम्यान, परमबीर सिंह यांच्या प्रकरणात जरी एखादी नवीन एफआयआर दाखल झाली तरी, त्याचा तपास सीबीआय करेल, असेदेखील न्यायालयने स्पष्ट केले आहे. या प्रकरणांची नि:पक्ष चौकशी होणे अपेक्षित असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी न्यायालयाने गृहमंत्री आणि आयुक्त जेव्हा अशा प्रकारचे आरोप एकमेकांवर करतात तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडतो. यासाठी सत्य समोर येणे आवश्यक असून त्यासाठी हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याचे म्हटले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *