पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:चारित्र्य अंतिम प्राधान्य बनल्याने लोक देहापुरते मर्यादित झाले

जगात केवळ तीनच समस्या आहेत. पहिली, पैसा असणे किंवा नसणे. दुसरी, पुरुषाच्या जीवनात स्त्री असणे किंवा नसणे आणि तिसरी, स्त्रीच्या जीवनात पुरुष असणे किंवा नसणे. उर्वरित सर्व समस्या याच तिन्हींचा विस्तार आहेत. आपल्याकडे जेव्हा अष्टलक्ष्मीचे पूजन केले जाते, तेव्हा त्यांचे एक रूप ‘गजलक्ष्मी’ देखील आहे. यात लक्ष्मी माता पांढऱ्या हत्तीवर विराजमान आहे. हा पांढरा हत्ती उडूही शकतो. याचा अर्थ असा की, पैसा काहीही करू शकतो. म्हणूनच तो समस्या आणि समाधान, दोन्ही बनतो. दुसऱ्या व तिसऱ्या समस्येत सर्व खेळ स्त्री-पुरुषाचा आहे. आजकाल चारित्र्य व नैतिकता या गोष्टी अंतिम प्राधान्य बनत आहेत, म्हणूनच लोक केवळ देहापुरते मर्यादित झाले आहेत. मध्यंतरी ऐकले की, एका पाच वर्षांच्या मुलीवर तिच्याच नात्यातील तेरा वर्षांच्या भावाने अत्याचार केला. ती मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना इतर बातम्यांसारखीच आली आणि गेली, परंतु ती ही चिंता सोडून गेली की, या तीन समस्यांपैकी उर्वरित दोन समस्या आता अधिक रौद्र रूप धारण करतील.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *