पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन, नेताजी बोस यांच्या पुतळ्याचेही अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’ अर्थात ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या मार्गाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. याच मार्गावर प्रजासत्ताक दिन परेडसह अनेक महत्त्वाचे कार्यक्रम होत असतात. या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. उद्घाटनानंतर बोस यांच्या जीवनावर आधारीत ड्रोन शोचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, सरकारकडून पुढील चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नव्याने उभारण्यात आलेला ‘कर्तव्य पथ’ हा हिरवाईने नटलेला आहे. १६.५ किलोमीटरचा हा रस्ता लाल ग्रेनाईटने बनलेला आहे. या मार्गावर सुशोभित कालवे, अत्याधुनिक सार्वजनिक सुविधा, विविध राज्यांची खाद्यसंस्कृती दर्शवणारी १६ दुकाने उभारण्यात आली आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *