नितीन गडकरी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्रत्येक राजकीय पाऊल उत्साहाने वाढत आहे. मात्र यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीच खिचडी शिजताना दिसत आहे. रविवारी रात्री उशिरा भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले.

ही भेट वैयक्तिक असल्याचं म्हटलं जात असलं, तरी महाविकास आघाडी सरकारवर उघडपणे टीका करणाऱ्या राज ठाकरेंसोबत गडकरींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रात्री १० वाजेच्या सुमारास पोहोचले. यानंतर गडकरी हे १२ वाजेच्या सुमारास राज यांच्या घरातून बाहेर पडले.

ही राजकीय बैठक नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी चांगले संबंध आहेत. मी त्यांचे नवीन घर बघायला आणि त्यांच्या आईची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. ही पूर्णपणे वैयक्तिक भेट होती. आजच्या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात भाजप आणि मनसे यांची युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply