नागपूर : मोदींच्या हस्ते उद्घाटनाआधीच शिंदे-फडणवीस अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये; समृद्धी महामार्गावरुन करणार एकत्र प्रवास

नागपूर-मुंबई या बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण 11 डिसेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या महामार्गवर ट्रायल घेणार आहेत. नागपूर ते शिर्डीपर्यंत ते एकत्र प्रवास करणार आहेत.

या रस्त्यावर प्रवास करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  म्हणाले की, मला आनंद आहे की, महाराष्ट्रातल्या गेम चेंजर अशा या प्रोजेक्टवर आम्ही काम केलं आहे, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या महामार्गाला सुरुवात झाली. ज्या पद्धतीने पुणे-मुंबई रस्ता झाला त्याच पद्धतीने हा रस्ता सुद्धा नागपूर-मुंबई गेम चेंजर ठरेल आणि उद्योग धंद्यांना चालना मिळेल. 

हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या संपूर्ण भागाला समृद्धी देणारा हा रस्ता आहे आणि या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिले आहे याचं समाधान आम्हाला आहे. ज्या पद्धतीने हा रस्ता आहे, एक समृद्धी एक्सप्रेस वेगवान रस्ता त्याच पद्धतीने आमचं सरकारचं काम सुद्धा काम करत आहे. अनेक निर्णय आम्ही वेगाने घेतले आहे. सर्वांना सोबत घेऊन आम्ही वेगाने काम करत आहोत. आज या रस्त्यावरून प्रवास करणार आहे आणि या महामार्गाची पाहणी करणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्यांची तुलना कुणाचीही होऊ शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला आहे हे अख्ख्या जगाला माहीत आहे.

 
You May Like


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply