नवी दिल्ली : देशात चोवीस तासात दुप्पट रुग्ण! 2000 हून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गानं डोकं वर काढलं आहे. गेल्या चोवीस तासाच दुप्पट कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाल्यानं चितेत भर पडत आहे. याकाळात २,१८३ नवे रुग्ण आढळून आले असून काल १,१५० रुग्ण आढळून आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. 

चोवीस तासातील नोंदीनुसार सोमवारी भारतात २,१८३ नवे रुग्ण आढळून आले, तर २१४ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूंमध्ये केरळमधील ६२ रुग्णांच्या मृत्यूंचा समावेश आहे. दरम्यान, सध्याचा कोविडचा रिकव्हरी रेट ९८.७६ टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३२ टक्के आहे. तर दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट हा ०.८३ टक्के इतका आहे. सध्या देशात ११,५४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात देशात २,६१,४४० कोरोनाच्या चाचण्या पार पडल्या.

दरम्यान, भारताचं कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचं प्रमाण १८६.५४ कोटी डोसच्यावर गेलं आहे. यांपैकी २.४३ कोटी डोस हे १२ ते १४ वयोगटातील मुलांना देण्यात आले आहेत. या वयोगटातील मुलांसाठी १६ मार्चपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply