नवी दिल्ली : ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी पुढच्या महिन्यात होणार आहे. ही सुनावणी आता 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे.

गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना कोणाची? यावर सत्तासंघर्ष दिसून येत आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी सुनावणीस सुरुवात झाली. यावेळी यासंदर्भात पुढील सुनावणी आता १४ फेब्रवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सरन्यायाधीश वाय. एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरु केला. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सात सदस्यांच्या घटनापीठाकडे देण्याची मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली.

युक्तीवादादरम्यान सिब्बल यांनी गेल्या सुनावणीवेळी आम्ही नबाम राबिया खटल्याचा दाखला दिला होता. तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यावं, अशी विनंती केल्याची आठवणही सिब्बल यांनी करुन दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचं मत घेऊन ही सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply