नवी दिल्ली : ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावर आज महासुनावणी; दोन्ही गटांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज (10 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार आहे.

शिवाय सर्व पक्षकारांना लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार ठाकरे गट आणि शिंदे गट आपली बाजू मांडणार आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगात शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाण दोनही गटापैकी कोणाला मिळणार या संदर्भात पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडील प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टाकडे विनंती केली होती. त्यानुसार 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत कोर्टानं निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून एकनाथ शिंदे यांच्या वतीने संजय किशन कौल तर सुभाष देसाई यांच्या वतीने कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकील बाजू मांडणार आहेत. तर केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ते तुषार मेहता बाजू मांडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी करणारे न्यायाधीश

1. न्यायमूर्तीं धनंजय चंद्रचूड

2.न्यायमूर्तीं एम आर शहा

3.न्यायमूर्तीं कृष्ण मुरारी

4.न्यायमूर्तीं हिमाकोहली

5. न्यायमूर्तीं पी नरसिंहा यांचा

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे ही सुनावणी सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply