गुजरात: दोन ट्रक-कारमध्ये जोरदार धडक, ६ जणांचा होरपळून जागीच मृत्यू,

नवी दिल्ली: गुजरातमधील मोडासा येथील आलमपूरजवळ दोन ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. जोरदार धडकेनंतर कारने पेट घेतला, ज्यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर मोडासा-नडियाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. महामार्ग बंद झाल्यामुळे सध्या येथे दहा किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ५ पेक्षा जास्त लोक अजूनही वाहनांच्या आत अडकल्याचे वृत्त आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले आहे.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *