नगर-औरंगाबाद महामार्गावर मोठा अपघात; चार मित्रांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

अहमदनगरमध्ये मोठा अपघात झाला आहे. नगर-औरंगाबाद महामर्गावर कायगाव (ता.गंगापूर) झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर कायगाव जवळील गोदावरी शाळेच्या समोर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बजाजनगर येथील चार व्यावसायिकांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरहून औरंगाबादच्या दिशेने जाणारी कार (क्रमांक एम.एच.२० सी. एस. ५९८२ ) च्या चालकाला कायगाव जवळ वळणाचा अंदाज नाही. त्यामुळे भरधाव कार दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार (एम.एच.२७ बी. झेड. ३८८९) ला धडकली. यात औरंगाबादकडे जाणाऱ्या कारमधील चौघे गंभीर जखमी झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक चौरे, उपनिरीक्षक विलास , घुसींगे,डॉ. प्रशांत पंडूरे, रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, सचिन सुराशे, अनंता कुमावत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मृतांमधील तीघांची नावे समजली असून रावसाहेब मोटे(५६) सुधीर पाटील (४५) रा. वाळूज सिडको महानगर रतन बेडवाल (३८) रा. वाळूज व इतर एकाचा मृत्यू झाला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply