नंदुरबार : १० गावांचा संपर्क तुटलेल्या पूलाच्या दुरुस्ती कडे प्रशासनाचे दुर्लक्ष

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ अतिवृष्टीत नागन नदीला आलेल्या पुरामुळे मातीचा पूल वाहून गेल्याने दहा गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नसून ग्रामस्थांनी हातात पावडी घेत दगड माती टाकून तात्पुरता नदीतून रस्ता करण्यास सुरुवात केली आहे.

नवापूर विधानसभाचे आमदार शिरीष नाईक, बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदार पाहणीसाठी आले अन् फक्त फोटो काढून निघून गेले दुरुस्ती करत नाही. असा आरोप या गावातील नागरिकांनी केला आहे.

सोनखांब, विसरवाडी, जामनपाडा येथील शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालक आपल्या मुलांना खांद्यावर बसवून शाळेत जा सरकार आपलं ऐकणार नाही असं सांगत नदीतून मार्ग काढत असल्याची परिस्थिती असतानाही प्रशासन दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे.

निमदर्डा गावाजवळ गेल्या उन्हाळ्यात मोठ्या पुलाचे काम सुरू होते. अर्धवट केलेले काम ही निकृष्ट दर्जाचे असून ठेकेदाराने अर्धवट काम करून पळ काढल्याने नागरिकांच्या रहदारीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला मातीचा पूल अतिवृष्टीत पुरामुळे वाहून गेल्याने नागरिकांना नदीच्या पुरातून मार्ग काढावा लागत आहे.

शेती काम व दूध विक्रेते शेतकरी, शाळेत जाणारे मुले, दवाखान्यात व बाजारपेठेत जाणाऱे नागरिक नदीच्या पुरात वाहून गेल्यावर जबाबदार कोण असा संतप्त सवाल प्रशासनाला केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply