नंदुरबार : नर्मदा काठावरून सव्‍वालाखाचे सागवान लाकूड जप्त; धडगाव वन विभागाची कारवाई

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या मकडकुंड गावात अवैधरित्या लाकूड विक्री होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्‍यानुसार वन विभागाने कारवाई केली असता नर्मदा काठावरून सव्‍वालाखाचे सागवान लाकूड जप्त केले आहे.

वन विभागाच्‍या पथकाने गावात तपासणी केली असता एक लाख 25 हजाराच्या लाकूड मिळून आले असून या लाकडांची कुठेही नोंद नसल्याने वन विभागाने लाकूड जप्‍त केले आहे. यात सागदांडी, साग बेलखे, खैर प्रजातीचे सालिसह व विनासालीसह बेवारस लाकूड साठा जप्त केला आहे. सागाच्या लाकूड 4.80 घनमीटर माल किंमत 96 हजार 407 व खैर एकूण 1.373 घनमीटर 27 हजार 133 रूपयांचा माल जप्त केला आहे. असा एकूण 1 लाख 23 हजार 540 रुपयांचा मुददेमाल ताब्यात घेतला आहे.

वन विभागाने नर्मदा नदी किनारी अतिशय दुर्गम भागात नर्मदा नदीमधून सदर माल बार्जच्‍या साह्याने पौला येथून वाहतूक करून पुन्हा खाजगी वाहनाने वाहतूक करून धडगाव टिंबर डेपोत जमा केला. सदरच्या गुन्हा हा वनरक्षक माकडकुंड यांनी नोंदविला. पुढिल तपास वनपाल माकडकुंड करित आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply