नंदुरबार : जळगावच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; चालक घटनास्थळावरून फरार

नंदुरबार : गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील गावात हा अपघात घडला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजणाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील तापी जिल्ह्यातील कुकरमुंडा तालुक्यातील राजपूर गावाजवळ विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली आहे. या अपघातात सुमारे ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती निझर पोलीसांनी (Police) दिली आहे.

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेरहून गुजरात राज्यातील पावागडला जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा अपघात झाला आहे. बसमध्ये दहावीत शिकणारे ५१ विद्यार्थी आणि शिक्षकांसह ६५ प्रवासी होते. बस चालकाच्या चुकीने बस रस्त्याच्या कडेला उतरली, बस विजेच्या खांबाला धडकून उलटली. यात चार विद्यार्थी जखमी झाले आहे. (Bus Accident News)

अमळनेर शहरातील लोकमान्य हायस्कूलचे विद्यार्थी होते.विश्वकर्मा टूरिस्ट ट्रॅव्हल्स खाजगी बस चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.घटनेची माहिती मिळताच निझर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चालकावर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply